07 July 2020

News Flash

प्रियकराच्या मदतीने भावाचा खून

खुनाचा प्रकार दहा दिवसांपूर्वी घडला होता. मात्र, आज हा प्रकार उघडकीस आला.

प्रतिनिधिक छायाचित्र

सांगली : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या भावाचाच बहिणीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथे सोमवारी उघडकीस आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. खुनाचा प्रकार दहा दिवसांपूर्वी घडला होता. मात्र, आज हा प्रकार उघडकीस आला.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, डोंगरसोनी येथील रमेश बाळासो झांबरे या तरुणाचा मृतदेह वाघोली रस्त्यावर मिळाला होता. या प्रकाराचा तपास करीत असताना या खून प्रकरणाचा उलघडा झाला. या खूनप्रकरणी सारिका संपत पाटील (वय ३८) आणि सुधाकर तानाजी झांबरे (वय ३८) या दोघांना रविवारी रात्री अटक केली असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आज आदेश दिले. संशयितांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंध होते. यावरून मृत रमेश झांबरे यांने बहीण सारिका हिच्याशी वादही घातला होता. अनैतिक संबंधांमध्ये भावाचा अडथळा ठरत असल्याचे दिसताच सारिकाने प्रियकराच्या मदतीने काटा काढण्याचा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2018 1:02 am

Web Title: girl kills brother to remove obstacle from love affair
Next Stories
1 पाहा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची लाईव्ह आरती
2 डॉल्बी, डीजेवरचा धिंगाणा मैदानावर करा, चंद्रकांत पाटील यांचा उदयनराजेंना टोला
3 पुणे महापालिकेच्या नव्या सभागृहात पडला लाकडी ठोकळा, विरोधक हेल्मेट घालून सभागृहात
Just Now!
X