01 April 2020

News Flash

नराधम बापाकडून मुलीवर बलात्कार

आरोपीविरुद्ध पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अकोला : नराधम बापाने एका वर्षांपासून मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक व नात्याला काळिमा फासणारी घटना खामगाव तालुक्यात उघडकीस आली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. खामगाव तालुक्यातील व पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक कुटुंब नातेवाईकांकडे गेल्या महिनाभरापासून राहत होते. त्याठिकाणी नराधम बापाने मुलीला धमकावत बलात्कार केला. कुणाला काही सांगितल्यास तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. यापूर्वी सुद्धा त्याच्याकडून तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला होता. ठाणेदार चव्हाण यांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2020 12:27 am

Web Title: girl raped by father from last one year zws 70
Next Stories
1 नाणारच्या रणात शिवसेना विरुध्द शिवसेनाच!
2 तीन वर्षांपासून कृषी पतपुरवठा ठप्प
3 सिद्धिविनायक ट्रस्टकडून ‘शिवभोजन थाळी’ योजनेसाठी ५ कोटींचा निधी
Just Now!
X