25 September 2020

News Flash

फेसबुकवरील सुसाईड नोटमुळे वाचले तरुणाचे प्राण

मित्रयादीतील तरुणीने पोलिसांना घटनेची माहिती दिली

संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद जिल्हयातील मंठा येथील एका तरुणाने आत्महत्या करणार असल्याचा संदेश फेसबुकवर पोस्ट केला होता. ही पोस्ट वाचून औरंगाबादमधील अॅडव्होकेट स्वाती नखाते यांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. सचिन काळे पाटील असे या तरुणाचे नाव आहे. नखाते यांनी वेळीच पोलिसांना याबद्दलची माहिती दिल्याने सचिन काळे पाटीलचे प्राण वाचले.

मराठा क्रांती मोर्चामुळे सचिन आणि स्वाती यांची भेट झाली होती. यानंतर त्यांची फेसबुकवर मैत्री झाली. सचिनने काल (रविवारी) आत्महत्या करणार असल्याची पोस्ट केली होती. रात्री ८ वाजता आत्महत्या करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. नखाते यांनी त्यांची पोस्ट पाहताच पोलिसांनी त्याबद्दलची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी सचिनला ताब्यात घेतले. यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नखाते यांनी फेसबुकवरील पोस्टच्या स्क्रीनशॉटच्या मदतीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर सचिनच्या फेसबुक वॉलवरुन पोस्ट हटवण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2017 9:33 am

Web Title: girl saves youths life after reading facebook post regarding suicide
Next Stories
1 मालेगावमध्ये भाजप-सेना कार्यकर्त्यांमध्ये राडा
2 दहा लाख शेतकऱ्यांना बोगस म्हणताना लाज कशी वाटत नाही? – अजित पवार
3 गडकरींची भेट महामार्गावरील प्रलंबित प्रश्नांसाठी : काँग्रेसचे खासदार सातव यांचे स्पष्टीकरण
Just Now!
X