20 February 2020

News Flash

औरंगाबाद पूर्वची उमेदवारी मुस्लिमांच्या पदरात टाका; काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी

औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा राजेंद्र दर्डा यांनाच उमेदवारी द्यावी, असा आग्रह नगरसेवकांनी अ. भा. काँग्रेस कमिटीच्या गजेंद्रसिंह शक्तावत यांच्यासमोर धरला खरा, मात्र याच

| July 14, 2014 01:40 am

औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा राजेंद्र दर्डा यांनाच उमेदवारी द्यावी, असा आग्रह नगरसेवकांनी अ. भा. काँग्रेस कमिटीच्या गजेंद्रसिंह शक्तावत यांच्यासमोर धरला खरा, मात्र याच मतदारसंघातून काही तरुणांनी मुस्लिम समाजातून उमेदवार द्यावा, अशी मागणी जोरदारपणे केली. विधान परिषदेची एक जागा मुस्लिम समाजातील व्यक्तीला मिळेल, असे अभिप्रेत होते. आमदार एम. एम. शेख यांना पुन्हा संधी मिळेल, असे चित्र असतानाही नव्या नियुक्त्यांमध्ये कोणाचाच विचार केला गेला नाही. त्यामुळे या मतदारसंघातून मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी मिळावी, अशी मागणी रविवारी करण्यात आली.
शहरातील गांधी भवन येथे आज औरंगाबाद पूर्व, पश्चिम व मध्य मतदारसंघात कोणते उमेदवार सोयीस्कर ठरू शकतील, याची चाचपणी करण्यासाठी शक्तावत औरंगाबाद येथे आले होते. पूर्व मतदारसंघाचा आढावा घेताना मुस्लिम तरुणांनी त्यांच्या भावना तिखट शब्दांतच मांडल्या. एक जण म्हणाला, मुंबई येथे आमदार निवासात जायचे म्हटले तरी कोणाकडे उतरायचे, असा प्रश्न येतो. एक कार्यकर्ता तावातावाने म्हणाला, आम्ही कोण तुम्हाला सल्ला देणार? आम्ही सल्ला दिला तरी तो थोडाच ऐकला जातो? मुस्लिमांचा आवाज मुंबईला जाईपर्यंत विरून जातो. त्यामुळे किती बोलायचे, असा प्रश्नच आहे. तावातावाने बोलणाऱ्या या कार्यकर्त्यांना शक्तावत यांनी मी तुमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आलो आहे. ते वरिष्ठापर्यंत पोहोचवेन, असे सांगितले. पूर्वमधून राजेंद्र दर्डा यांनाच उमेदवारी दिली जावी, असा आग्रह केल्याचे नगरसेवक डॉ. जफर खान यांनी सांगितले. या मतदारसंघात काँग्रेसचे १० नगरसेवक आहेत. त्यातील ६ नगरसेवक मुस्लिम समाजाचे आहेत.

First Published on July 14, 2014 1:40 am

Web Title: give chance to muslim in orient aurangabad demand of congress volunteer
Next Stories
1 बाबा, भेटायला येताना प्यायला पाणी आणा हो!
2 पंकजा मुंडेही करणार संघर्ष यात्रा
3 पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी नांदेड येथे ‘समाधान कक्ष’
Just Now!
X