करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात आणि राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे लॉन्स आणि मंगल कार्यालये ओस पडली आहेत. सरकारकडून सोशल डिस्टसिंगसह अनेक बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे मंगल कार्यालय आणि लॉन्स चालक अडचणीत आले आहेत. सरकारनं फिजिकल डिस्टसिंग पाळण्याची अटीसह ५० लोकांच्या उपस्थितीतील विवाह सोहळ्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नाशिक येथील मंगल कार्यालय, लॉन्स व हॉल असोसिएशनच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. या मागणीवर लवकरच शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन भुजबळ यांनी दिल आहे.

करोनामुळे लागू करण्यात आलेल्या कलम १४४ मध्ये शिथिलता देऊन लॉन्स व मंगल कार्यालयात शासकीय आदेशानुसार लग्न करण्यास परवानगी देण्यात यावी, या मागणीसंदर्भात आज (२९ मे) नाशिक मंगल कार्यालय, लॉन्स व हॉल असोसिएशनच्या वतीने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ तसेच असोसिएशनचे पदाधिकारी सुनील चोपडा, संदीप काकड, समाधान जेजुरकर, हेमंत निमसे उपस्थित होते.

supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज

“शासनाने कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर कलम १४४ मध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली असून, लग्न सोहळ्यासाठी ५० लोकांना जमण्यास परवानगी दिलेली आहे. अशा परिस्थितीत लोक आपल्या घरात किवा सोसायटीच्या परिसरात लग्न सोहळा करत आहेत. मात्र याठिकाणी करोनाचे संक्रमण होण्याच्या भीतीने परिसरातील नागरिक तक्रार करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या विधींना अडचणीत येत आहे. शहरातील अनेक फार्म हाऊस तसेच हॉटेलमध्ये विवाह पार पडत आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या सर्व अटी शर्थीचे पालन करून मंगल कार्यालय तसेच लॉन्स याठिकाणी लग्न सोहळ्यांना परवानगी देण्यासंदर्भात शासनस्तरावर निर्णय घेण्यात यावा,” अशी असोसिएशननं केली आहे.