News Flash

करोनावरील १०३ रुपयांच्या ‘त्या’ गोळीवर बंदी आणा; अमोल कोल्हेंची मागणी

केंद्र सरकारला अमोल कोल्हेंनी केली विनंती

देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बाजारात याच करोनावर वेगवेगळी औषध उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी फॅबीफ्लू नावाच्या औषधावर आक्षेप घेतला असून त्याबद्दल त्यांनी पत्रही लिहिले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना एक सविस्तर पत्रही लिहिले आहे. याबाबत कोल्हेंनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

अमोल कोल्हेंनी पत्रात म्हटलेय की, ‘ग्लेनमार्क फार्मा या औषध कंपनीने कोरोनावर एक औषध बाजारात आणले आहे. एका गोळीची किंमत १०३ रुपये इतकी आहे. करोनातून मुक्त होण्यासाठी रुग्णाला या गोळ्याचे १४ दिवसांत १२२ गोळ्यांचे सेवन करायचे आहे. याची एकूण किंमत १२ हजारांच्या पुढे जाते. एवढी किंमत सर्वसामान्यांना परवडणार आहे का?’

आणखी वाचा- पतंजलीच्या औषधीला अधिकृत मान्यता नाही, नागरिकांनी खोट्या दाव्यांना बळी पडू नये : अमित देशमुख

‘महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णावर याची चाचणी घेण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. पण औषधाची किंमत ठरवताना गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांचा विचार केलेला दिसत नाही, असेही कोल्हेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे.’


तसेच अमोल कोल्हेंनी ग्लेनमार्क कंपनीच्या फॅबिफ्ल्यू या औषधाच्या एकूण दर्जावर प्रश्न उपस्थित केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 4:49 pm

Web Title: glenmark pharmaceuticals fabiflu coronavirus amol kolhe nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 औरंगाबादमध्ये करोनाचा कहर; बजाज कंपनीतील ७९ कर्मचाऱ्यांना संसर्ग
2 “करोना झाल्याचं समजताच पंकजा यांचा फोन आला आणि म्हणाल्या…”; धनंजय मुंडेंनी सांगितली आठवण
3 अजिंक्य रहाणेनं केलं आदित्य ठाकरेंच्या निर्णयाचं कौतुक
Just Now!
X