News Flash

म्युकरमायकोसिस : महाराष्ट्रातील औषध पुरवठ्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

कोरोना आणि म्युकरमायकोसीस आजाराबाबतच्या उपाययोजनांचा आज आढावा घेण्यात आला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते

राज्यात म्युकरमायकोसीसच्या उपचारासाठीच्या Amphotericin B या इंजेक्शनच्या ६० हजार कुप्या जूनच्या पहिल्या आठवड्यात थेट महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मंत्रालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आणि म्युकरमायकोसीस आजाराबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

यासंदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात सध्या म्युकरमायकोसीसचे २२४५ रुग्ण आहेत. या आजारावर उपचारासाठी ॲम्फोटेरीसीन-बी इंजेक्शन वापरले जात असून त्याची किंमत जास्त आहे. केंद्र शासनाकडून या इंजेक्शनचं वाटप केलं जात आहे. मात्र महाराष्ट्रात या इंजेक्शनसाठी शासनानं ग्लोबल टेंडर काढलं असून त्या माध्यमातून जूनच्या पहिल्या आठवड्यात ६० हजार कुप्या उपलब्ध होतील.

हेही वाचा- Maharashtra Covid 19: या १८ जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद; कोव्हिड केंद्रातच व्हावं लागणार दाखल

म्युकरमायकोसीस या आजाराला महाराष्ट्र शासनाने Notifiable Disease म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची नोंद घेतली जाणार आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून त्यासाठी राज्यभरातल्या १३१ रुग्णालयांमध्ये मोफत उपचार होणार आहेत. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा समावेश आहे. सध्या राज्यात २२०० रुग्णांपैकी १००७ रुग्णांवर महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी नसलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसचे काही रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना रुग्णांसाठीच्या उपचारासाठी जे दर निश्चित करण्यात आले आहेत ते म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना लागू करून त्यानुसार उपचार व्हावेत यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 4:46 pm

Web Title: global tender for amphotericin b medicine state will get it in the first week of june said rajesh tope health minister vsk 98
Next Stories
1 काँग्रेसने मोदी सरकारला डिवचले; लावले ‘अच्छे दिन’चे फलक
2 VIDEO: बीडमध्ये भिकाऱ्याची १ लाख ७२ हजारांची रक्कम लंपास; पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावला शोध
3 Maharashtra Covid 19: या १८ जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद; कोव्हिड केंद्रातच व्हावं लागणार दाखल
Just Now!
X