गोव्याहून दिल्लीपर्यंत राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करण्याचे गोव्यातील नागरिकांचे स्वप्न रविवारी प्रत्यक्षात आले. गोवा-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मडगाव रेल्वे स्थानकात हिरवा कंदील दाखवला.
ही एक्स्प्रेस मडगाव ते हजरत निजामुद्दीन आणि हजरत निजामुद्दीन ते मडगाव अशी धावेल. आठवडय़ातून दोनदा धावणारी ही एक्स्प्रेस प्रत्येक रविवार आणि सोमवारी सकाळी १०.०५ वाजता मडगाव स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४० वाजता हजरत निजामुद्दीन स्थानकात पोहोचेल. ही गाडी थिविम, कुडाळ, रत्नागिरी, पनवेल, सुरत, वडोदरा आणि कोटा स्थानकांवर थांबेल, असे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 16, 2015 3:25 am