एखाद्या बकऱ्याला बाजारात लाखोंची बोली लागल्याचं तुम्ही कधी ऐकलतं का? ऐकलं नसेल तर हे खरं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या बकऱ्याच्या मालकाने कोट्यवधी रुपयांची बोली लावली होती. या बकऱ्याच्या ‘मोदी’ या नावाच्या करिश्म्यामुळे एवढी मोठी बोली लागली आहे. सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीच्या प्राण्यांच्या बाजारातील ही घटना आहे.

गेल्या आठ महिन्यांपासून लॉकडाउनमुळे सर्वकाही ठप्प झालं असल्याने आटपाडीतील प्राण्यांच्या बाजारालाही मोठा फटका बसला. प्राणी विक्रेत्यांना यामुळे मोठ्या नुकसानीला समोरं जावं लागलं. मात्र, आता इथली परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. पुन्हा एकदा प्राण्यांची मागणी वाढली आहे.

parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
MS Dhone fan buys 64000 tickets
मुलीच्या शाळेची फी भरली नाही, पण धोनीच्या चाहत्याने IPL तिकीटासाठी ६४ हजार खर्च केले
Maldhok birds
अग्रलेख: पूतनामावशीचे पर्यावरणप्रेम!
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

दरम्यान, प्रसिद्ध असलेल्या आटपाडीच्या या प्राण्यांच्या बाजारात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणावर शेळ्या-मेंढ्या विक्रीसाठी आल्या होत्या. यांपैकी एका बकऱ्याला तब्बल ७० लाखांची बोली लागली. सांगोला तालुक्यातील चांदोळवाडीचे शेतकरी बाबुराव मेतकरी यांचा हा बकरा असून त्यांना तो दीड कोटी रुपयांना विकायचा होता.

तुम्ही म्हणालं या बकऱ्यामध्ये असं काय विशेष आहे. तर या बकऱ्याचं नाव ‘मोदी’ असं ठेवण्यात आलं असून त्याच्या मालकाने तब्बल दीड कोटी रुपयांची बोली लावली होती. खरेदीदारानं त्यांना जास्तीत जास्त ७० लाख रुपयांतच व्यवहार होईल असं सांगितलं. मात्र, मेतकरी यांना ते मान्य झालं नाही त्यामुळे हा बकरा अद्यापही विकला गेला नाही.