News Flash

दुर्दैवी ! चंद्रपुरात रेल्वेखाली चिरडला गेला बकऱ्यांचा कळप

शेतात बसलेला बकऱ्यांचा कळप अचानक रेल्वे क्रॉसिंगच्या दिशेने पळत सुटला आणि नेमक्या त्याच वेळेस रेल्वे आल्याने ही घटना घडली

भरधाव वेगाने येणार्या रेल्वेखाली बकऱ्यांचा कळप चिरडला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील बल्लारपूर मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगजवळ ही धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेत जवळपास १०० बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चुनाळा येथील लिंगय्या नामक गोलकर व्यक्तीच्या जवळपास १५० बकऱ्यांचा कळप रेल्वे क्रॉसिंग जवळील एका शेतात बसवण्यात आला होता. परंतु सकाळी अचानक हा कळप रेल्वे क्रॉसिंगच्या दिशेने पळत सुटला आणि नेमक्या त्याच वेळेस रेल्वे आल्याने दुर्दैवाने जवळपास १०० बकर्‍या आणि मेंढ्या चिरडल्या गेल्या. या घटनेमुळे बकरी मालकाचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाले असून त्याला भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 1:47 pm

Web Title: goats died after railway hit them near crossing in chandrapur sgy 87
Next Stories
1 कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे : भास्कर जाधव
2 मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिअॅट दाखल
3 रत्नागिरी – आंबेनळी घाटात ८०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक
Just Now!
X