नाईकबाच्या नावानं चांगभलं असा जयघोष अन् गुलाल खोब-याची एकच उधळण करीत भाविकांच्या बाहूगर्दीत श्रीक्षेत्र बनपूरी (ता. पाटण) येथील नाईकबा देवाची यात्रा उत्साहात पार पडली. ३ लाखांवर भाविकांनी यात्रेस हजेरी लावल्याचा दावा यात्रा समितीने केला आहे.
पाटणचे तहसीलदार रवींद्र सबनीस, प्रांताधिकारी किशोर पवार, महसूल व विविध विभागाचे कर्मचारी नाईकबा मंदिर परिसरात यात्रेच्या नियोजनावर लक्ष ठेवून होते. महाराष्ट्र व कर्नाटकातील अगणित भाविकांचे अढळ श्रध्दास्थान असणा-या, तसेच बनपुरी व जानुगडेवाडी, (ता. पाटण) या गावांचे ग्रामदैवत असणा-या नाईकबा देवाच्या यात्रेनिमित्त नाईकबाचा डोंगरमाथा व परिसर भाविकांनी फुलून गेला होता. असंख्य भाविक मुक्कामाच्या तयारीने यात्रा स्थळावर दाखल होते. पहाटे ५ वाजता नाईकबाची आरती व पूजा करण्यात आली. त्यानंतर पहाटे ६ वाजता नाईकबाच्या छबिन्याला सुरूवात झाली. छबिन्यात नाईकबाच्या पालखीसह विविध देवांच्या सासनकाठय़ा ढोल-ताशांच्या तालात नाचत होत्या. सासनकाठय़ांचे नयनरम्य दृश्य डोळय़ांचे पारणे फेडणारे होते. भाविकही मोठय़ा संख्येने छबिन्यात सहभागी झाले होते. यात्रा परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली होती.

plot developer killed by chopping his private parts in nagpur over illicit affairs
खळबळजनक! विवाहित प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून? अनैतिक संबंधाची किनार…
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
Saint Balumamas Rathotsav ceremony ended today with excitement
कोल्हापूर : भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत संत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात