राज ठाकरेंनी मानले मुकेश अंबानींचे आभार
गोदातीराला नवचैतन्य देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या ‘गोदा पार्क’ प्रकल्पाची तृष्णा आज (शनिवार) सादर केली गेली. गोदा पार्कच्या सुशोभिकरणाचे काम रिलायन्स फाऊंडेशनतर्फे केली जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच मुकेश अंबानी यांचे प्रकल्पाला साकारण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभारही मानले.
राज ठाकरे म्हणाले, “या प्रकल्पाची कल्पना मी मुकेश अंबांनी यांच्याजवळ मांडली. त्यांनी एका भेटीतच प्रकल्पाला सहकार्य करण्यासाठीचा होकार दिला. इतका मोठा प्रकल्पाला त्यांनी पहिल्या भेटीतच होकार दिला यावर पहिल्यांदा माझा विश्वासच बसेना. त्यानंतर मी त्यांचे आभार मानले. हा प्रकल्प साकारताना नाशिक महानगरपालिकेचे पैसे वाचविण्याचा आमचा प्रयत्न होता.” असेही राज ठाकरे म्हणाले. या गोदा पार्क मध्ये नाशिककरांना प्रवेशासाठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नसल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.