News Flash

अर्णबच्या केसालाही धक्का लागला तर…राम कदमांचा ठाकरे सरकारला इशारा

अर्णबला भेटायला तळोजा जेलमध्ये जातोय, हिम्मत असेल तर अडवून दाखवा !

रिपब्लीक टिव्हीचे मालक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेमुळे महाराष्ट्रासह केंद्रातलं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामीला अटक करुन तळोजा कारागृहात ठेवलं आहे. या प्रकरणी राज्यातील भाजपा नेते अर्णब यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत.

भाजपाचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी अर्णब गोस्वामी याला भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जाण्याची तयारी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान देत हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं म्हटलं आहे.

अर्णब यांच्या जिवाला धोका आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागला तर महाविकास आघाडी सरकार यासाठी जबाबदार राहिलं असं राम कदम यांनी ट्विट करुन म्हटलं आहे. दरम्यान आज दुपारी तीन वाजता अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 11:49 am

Web Title: going to meet arnab in taloja jail stop me if you can says bjl mla ram kadam psd 91
Next Stories
1 अलका कुबल यांनी घेतली उदयनराजे यांची भेट; प्राजक्ता गायकवाडशीही केली चर्चा
2 चुकीच्या माणसांच्या मागे उभे राहणे ही आपली संस्कृती नाही, पण…; शिवसेनेचा मोदींना चिमटा
3 अर्णब अलिबागमधून तळोजा तुरुंगात
Just Now!
X