News Flash

‘गोल्डन गर्ल’ अंजना ठमकेचा गौरव

नाशिकची ‘गोल्डन गर्ल’ असे बिरुद मिरविणारी राष्ट्रीय धावपटू अंजना ठमके हिचा तिच्या गणेशगाव या गावी खा. समीर भुजबळ यांनी सत्कार केला. अंजनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची

| February 14, 2013 04:57 am

नाशिकची ‘गोल्डन गर्ल’ असे बिरुद मिरविणारी राष्ट्रीय धावपटू अंजना ठमके हिचा तिच्या गणेशगाव या गावी खा. समीर भुजबळ यांनी सत्कार केला. अंजनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही भुजबळ यांनी या प्रसंगी दिली. गेल्या वर्षी नाशिकमधील १५ खेळाडूंना भुजबळ फाऊंडेशनने उत्कृष्ट प्रशिक्षण मिळावे म्हणून मुंबई येथे सिंथेटिक ट्रॅकचा सराव मिळावा म्हणून पाठविले होते. या सरावानंतर सर्वच खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचे अंजनाचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील इटावा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत अंजनाने तीन सुवर्णपदक मिळविले. त्याची खास दखल घेऊन खा. भुजबळ यांनी तिचा सत्कार केला. या वेळी केरू पाटील चुंबळे यांनी पाच हजार एक रुपये अंजनाला बक्षीस म्हणून दिले.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 4:57 am

Web Title: golden girl anjana thamke honoured
टॅग : Sports
Next Stories
1 उपकनिष्ठ राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर
2 साहित्य अकादमीच्या काव्यमहोत्सवासाठी ऐश्वर्य पाटेकर आमंत्रित
3 पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीस जन्मठेप