20 January 2020

News Flash

गुड न्यूज : राज्यात लवकरच आठ हजार पदांची पोलीस भरती

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात अनेक महिन्यांपासून जी पोलीस भरती थांबलेली होती, ती भरती प्रक्रिया आम्ही लवकरच सुरू करणार आहोत. जवळपास आठ हजार पोलीसांची भरती केली जाणार आहे. असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

अमरावतीमधील दर्यापूर येथील एका कार्यक्रमानंतर गृहमंत्र्यांनी माध्यमांनी ही माहिती दिली आहे.राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे गृहमंत्री  यांनी सांगितले.  याचबरोबर राज्य सरकार गृहखात्यामधील रिक्त पदं देखील लवकरच भरणार आहे. त्यामुळे आता पोलीस होऊ इच्छिणाऱ्या तरूणांसाठी ही आनंदाची व समाधानकारक बातमी आहे.

याचबरोबर पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी ग्रामीण तरुणांनी तयारी करून अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. गेल्या काही काळात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन समाज कंटकांना जरब बसण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा विचार असल्याचेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले.

First Published on January 15, 2020 9:25 am

Web Title: good news 8000 police posts recruit soon in the state msr 87
Next Stories
1 विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टरची आत्महत्या
2 मुनगंटीवार यांना पडलेल्या बाळबोध प्रश्नाचे उत्तर मोदीच देतील -शिवसेना
3 “येत कसा नाही आलाच पाहिजे”, नवरा अमेरिकेतून परत येत नसल्याने बायकोचं आंदोलन
Just Now!
X