24 September 2020

News Flash

गुड न्यूज : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन सफारी पुन्हा सुरू

जाणून घ्या काय आहे तारीख ; ऑनलाईन आरक्षण संकेतस्थळावर आजपासून उपलब्ध

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

चंद्रपूर येथील जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन (सफारी) दिनांक १ ऑक्टोंबर पासून नियमीतपणे सुरु करण्यात येत आहे. या पर्यटनाची सुरुवात राज्य सरकार व राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण यांच्या दिशा निर्देशानुसार होणार असल्याची माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी दिली आहे.

‘या’ नियमांचे पालन असणार बंधनकारक :
एका ओपन जिप्सी वाहनात एक वाहनचालक, एक मार्गदर्शक व चार पर्यटक एवढ्याच व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. दहा वर्षांखालील व ६५ वर्षांवरील व्यक्तींना तसेच गर्भवती स्त्रियांना पर्यटनासाठी प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशद्वारावर सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक राहील. प्रवेशद्वारातून पर्यटकास प्रवेश देण्यापूर्वी सर्व पर्यटक, जिप्सी चालक, मार्गदर्शक यांचे शरीराचे तापमान हे थर्मर स्क्रिनींग, ईन्फ्रारेड थर्मामीटरने तपासण्यात येईल. ते सर्वसाधारण असल्यासच त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. ताप-सर्दी-खोकला असलेल्या, आजारी असलेल्या कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींची माहिती नजीकच्या कोविड रुग्णालयात दिली जाणार आहे. प्रत्येकानी चेहऱ्यावर मास्क लावणे व सोबत रुमाल ठेवणे आवश्यक राहील, मास्क शिवाय प्रवेश दिल्या जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत वापरलेला मास्क, हातमोजे, फेस शिल्ड, पाण्याच्या बाटल्या इत्यादी साहित्य वनक्षेत्रात अथवा अन्यत्र फेकले जाणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल.
पर्यटन वाहनात बसण्यापूर्वी सर्वांनी सॅनिटायजरने हात निर्जंतुक करणे बांधनकारक असेल. त्याशिवाय कोणालाही जिप्सीमध्ये बसू दिले जाणार नाही किंवा प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशद्वारावर येण्यापूर्वी जिप्सीधारकांनी त्यांच्या जिप्सीमध्ये बसणाऱ्यांसाठी सॅनिटायजर ठेवणे बंधनकारक राहील. तसेच जिप्सीधारकांनी प्रवेशद्वारावर येण्यापूर्वी जिप्सीची साफसफाई व सॅनिटाईजेशन करणे आवश्यक राहील. पर्यटकांसाठी असलेली स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्यात येतील. प्रत्येक वापरानंतर स्वच्छतागृहे निर्जुंतीकरण करण्यात येईल. पर्यटन प्रवेशद्वारावर जिप्सीचे टायर निर्जंतुक (टायर बाथ) करण्याची सुविधा असणार असून, तसे करणे बंधनकारक राहील. या व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी येणाऱ्या सर्वांसाठी व्याघ्र प्रकल्पाचे, राज्य शासन, केंद्रशासन व स्थानिक प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

ऑनलाईन आरक्षण संकेतस्थळावर उपलब्ध:
पर्यटकांकरीता ऑनलाईन आरक्षणाची सुविधा www.mytadoba.org संकेतस्थळावर आज (१६ सप्टेंबर) पासून उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. यामध्ये बफर क्षेत्रातील विविध अॅक्टिव्हिटीचे आरक्षण सुद्धा पर्यटकांना ऑनलाईन प्रणालीद्वारे करता येणार आहे. विविध पर्यटन शुल्कामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पर्यटनाबाबत अधिक माहिती करीता ०७१७२-२७७११६ व ७५८८०६३४६३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याची व्यवस्था आजपासून उपलब्ध करण्यात आलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 4:47 pm

Web Title: good news tourism safari resumes at tadoba andhari tiger project msr 87
Next Stories
1 “मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास…,” छत्रपती संभाजीराजेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
2 “महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा,” नवनीत राणा यांची मोदी सरकारकडे मागणी
3 Coronavirus : राज्यात २४ तासांत दोन पोलिसांचा मृत्यू ; आणखी २४७ करोनाबाधित
Just Now!
X