News Flash

कोकण रेल्वे ठप्प; वाहतूक पूर्ववत होण्यास १२ ते १४ तास लागणार

उक्शी स्थानकाजवळ आज (सोमवार) सकाळी एका मालगाडीचे चार डबे रूळावरून घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

| April 14, 2014 10:33 am

उक्शी स्थानकाजवळ आज (सोमवार) सकाळी एका मालगाडीचे चार डबे रूळावरून घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. संगमेश्वर आणि निवसारमधील बोगद्यामध्ये हा अपघात झाला. दरम्यान, वाहतूक पूर्ववत होण्यासाठी १२ ते १४ तास लागतील अशी माहिती कोकण रेल्वेतर्फे देण्यात आली आहे. अपघातामुळे दादर-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन, जनशताब्दी मेल, दुरान्तो एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या विविध स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत. तसेच या मार्गावरील काही गाड्या इतर मार्गांवर वळवण्यात येणार असून काही गाड्या रद्द करण्यात येणार असल्याचेही कोकण रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त लवकर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 10:33 am

Web Title: good train derailed konkan railway service halted
टॅग : Konkan Railway
Next Stories
1 केवळ मूठभर लोकांचा विकास करण्याची भाजपची इच्छा – राहुल गांधी
2 प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
3 खाणीतील पाण्यात बुडाल्याने दोघांचा मृत्यू
Just Now!
X