News Flash

उस्मानाबादमध्ये ट्रक पलटी झाल्यानंतर लोकांची झुंबड; ७० लाखांचा माल लुटला

उस्मानाबाद येथे एक ट्रक पलटी झाला. या ट्रकमध्ये ७० लाख रुपयांचा माल होता.

प्रतिकात्मक छायाचित्र

उस्मानाबाद येथे एक ट्रक पलटी झाला. या ट्रकमध्ये ७० लाख रुपयांचा माल होता. तेथील रहिवासी आणि ग्रामस्थांनी हा माल लुटला आहे.  लोकांकडून लुटलेला माल परत आणण्यासाठी पोलिसांना पथके तयार करून आजूबाजूच्या भागात मोहीम राबवावी लागली.

वाशी तहसीलमधील तेरखेडाच्या लक्ष्मी पारधी पेडीजवळ पहाटे तीन वाजता सोलापूर-औरंगाबाद महामार्गावर ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  ते म्हणाले, ट्रकमध्ये मोबाइल फोन, संगणक, एलईडी, खेळणी व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या. सामान रस्त्यावर पडल्यानंतर ग्रामस्थांनी ते लुटण्यास सुरवात केली आणि काही लोकांनी कंटेनरचा दरवाजा तोडला. दरम्यान, स्थानिक पोलीस  नियंत्रण दलाला बोलावून घ्यावे लागले.

हेही वाचा- मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी लवकरच करमणुकीची सुविधा

अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही ग्रामस्थांनी पोलिसांच्या आवाहनानंतर हा माल परत केला, परंतु बऱ्याच लोकांनी माल परत आले केला नाही. पोलीस उपअधीक्षक मोतीचंद राठोड म्हणाले की, ७० लाख रुपयांच्या मालाची लूट झाली असेल. आतापर्यंत आम्ही ४० टक्के माल परत मिळवलै आहे. तसेच लोकांना माल परत करण्यास सांगितले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2021 6:04 pm

Web Title: goods worth rs 70 lakh stolen after truck overturns in osmanabad srk 94
टॅग : Crime News,Maharashtra
Next Stories
1 “…..म्हणून एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देतो”- खासदार राहुल शेवाळे
2 “मुख्यमंत्र्यांनी राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर पदाचा राजीनामा देण्याचं धाडस दाखवणार का?”
3 Maratha Kranti Morcha: मूक आंदोलनानंतर संभाजीराजेंचा मोठा निर्णय; म्हणाले…
Just Now!
X