29 January 2020

News Flash

वैद्यनाथच्या परिसरात ‘गोपीनाथगड’ साकारला

भगवानगड हा धार्मिक, तर गोपीनाथगड राजकीय शक्तीचा गड मानला जाणार आहे.

कमलाकृती आकार, २२ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरातील १८ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा भव्य कमलाकृती आकाराचा ‘गोपीनाथगड’ साकारण्यात आला आहे. आकर्षक शिल्पकलेचे प्रवेशद्वार, गोपीनाथ मुंडे यांचा २२ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा, प्रशस्त ध्यानमंदिर, समाधीस्थळ, थीम पार्क आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र या स्मारकात उभारण्यात आले आहे.
मुंडे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या राजकीय वारसदार ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचे संघर्षमय जीवन नव्या पिढीला प्रेरणादायी ठरावे या उद्देशाने भव्य स्मारक उभारण्याचे ठरविले. मुंडे यांचा राजकीय प्रवास, शेतकरी कुटुंबातील मुलगा ते केंद्रीय मंत्री आणि कायम संषर्घयात्री असाच राहिला. भगवानगड हा धार्मिक, तर गोपीनाथगड राजकीय शक्तीचा गड मानला जाणार आहे. वर्षभरापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. पुण्याच्या गार्डीयन प्रा. लि. कंपनीने या गडाची उभारणी केली. कोल्हापूर येथील कलाकारांनी तयार केलेला २२ फूट उंचीचा मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा, तर कमळाच्या फुलाच्या आकाराचे ध्यान मंदिर हे आकर्षण ठरले आहे. स्मारकात समाधीस्थळ तसेच केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. गडाचे लोकार्पण येत्या शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.

First Published on December 11, 2015 2:56 am

Web Title: gopinath gad at viadyanath
Next Stories
1 निकालाचा अभ्यास करून पुढचा निर्णय घेऊ – राज्य सरकार
2 धनगर आरक्षणाचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता
3 काल्र्याचे एकविरादेवी मंदिर अनधिकृत!