18 February 2019

News Flash

मंत्रालयात सरकारी कर्मचाऱ्याचा विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न

दिलीप सोनावणे या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला असून विष प्राशन करुन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

संग्रहित छायाचित्र

मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली. दिलीप सोनावणे या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला असून विष प्राशन करुन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला हे अद्याप समजू शकलेले नाही. दिलीप सोनावणे हे सरकारी कर्मचारी आहेत.

शुक्रवारी दुपारी मंत्रालयात उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांच्या दालनात दिलीप सोनवणे यांनी विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने सोनवणे यांना रुग्णालयात भरती केले असून त्यांच्या प्रकृतीबाबत तुर्तास कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, याची पोलीस चौकशी करत आहे.

जानेवारी महिन्यात भूसंपादन केलेल्या जमिनीच्या मोबदल्याच्या प्रश्नावरून मंत्रालय परिसरात शेतकरी धर्मा पाटील यांनी विषप्राशन करुन आत्महत्या केली होती. यानंतर मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे प्रकार वाढले आहेत.

First Published on October 12, 2018 4:46 pm

Web Title: government employee suicide attempt in mantralaya consuming poison