News Flash

मराठा आरक्षण टिकवण्यात आघाडी सरकार अपयशी – खोत

मराठा आरक्षण प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी आज संघटनेच्यावतीने सोमवारी अंगणामध्ये आंदोलन करण्यात आले.

मराठा आरक्षण प्रश्नी निवासस्थानी आई व नातवासह आंदोलन करीत असताना आ. सदाभाऊ खोत.

सांगली : मराठा समाजाला आरक्षण कायम राखण्यात महाविकास आघाडी सरकार अयशस्वी ठरले असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत रयत क्रांती संघटना लढा सुरूच ठेवेल, असा निर्धार  माजी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत यांनी सोमवारी केला.

मराठा आरक्षण प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी आज संघटनेच्यावतीने सोमवारी अंगणामध्ये आंदोलन करण्यात आले. आ. खोत यांनी इस्लामपूर येथील निवासस्थानी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आई रत्नाबाई व नातू स्पंदन खोत यांच्यासह आंदोलन केले.

मराठ्यांच्या पोरांचे आरक्षण बांधलं काठीला… महाविकास आघाडी सरकार गेलं काशीला, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपापल्या अंगणात आंदोलन केले असल्याचे आ. खोत यांनी सांगितले. विरोधी  पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या कष्टाने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले होते.  परंतु या महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षण धुळीला मिळवलं. यापुढे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत रयत क्रांती संघटना शांत बसणार नाही, असा इशारा या वेळी त्यांनी दिला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 1:44 am

Web Title: government fails to maintain maratha reservation akp 94
Next Stories
1 अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत
2 पालघर जिल्ह्यतील प्राणवायू प्रकल्पाची उभारणी जूनपर्यंत
3 वसईकरांना दिलासा
Just Now!
X