मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेल्या िपपरी बुटी गावातीलच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी शांता प्रल्हाद ताजने हिने विहिरीत उडी घेऊन केलेल्या आत्महत्तेच्या घटनेने यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त जिल्हा करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा म्हणजे ‘बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात’ ही म्हण सार्थ करणारी असल्याची टीका काँग्रेसने केली. शेतकरी विधवेच्या आत्महत्येने प्रशासनही हतबल झाले असून काँग्रेस आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.
जिल्हा परिषद सदस्य, माजी शिक्षण सभापती देवानंद पवार आणि त्यांच्या चमूने िपपरीला भेट दिली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीने गावाला काहीही फायदा झाला नाही. त्यांच्या भेटीनंतर नेत्यांच्या भेटींचा उपचार तेवढा पूर्ण झाला. शांता ताजनेसह ज्या सात शेतकऱ्यांना मनरेगा अंतर्गत विहिरी मंजूर झाल्या. त्यातील एकही शेतकरी पशाअभावी विहीर खोदू शकला नाही. विहीरच नाही. त्यामुळे विद्युत पंप आणि वीज जोडणीबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचा प्रश्न कायमच आहे. मुख्यमंत्री थांबलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत पावसात चौफेर गळत असल्याचेही दिसून आले. आम्ही भेट दिली तेव्हा िपपरीत पाऊस कोसळत होता. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार तसेच महसूल विभागाचे अधिकारी याच वेळी गावात होते. िपपरी येथीलच संजय बोंडे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची विधवा जयश्री बोंडे हिचे आíथक मदतीचे प्रस्ताव आणि राष्ट्रीय कुटुंब आणि अर्थसहाय योजनेचे प्रस्ताव अजूनही धूळखात पडून असल्याचे कटू वास्तव यावेळी समोर आले आहेत. मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतरही गावची स्थिती ‘जैसे थे असल्याचे विदारक चित्र आहे, असे पवार यांनी सांगितले. ही घटना फडणवीस सरकारसाठी कलंक असून सरकार शेतकरी आत्महत्याबाबत संवेदनशील नाही. केवळ कागदी घोडे मिरवले जात आहेत, अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी सदस्य अशोक बोबडे यांनी व्यक्त केली. जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राज्यपालांच्या सचिवांपासून तर तीन-तीन प्रधान सचिव, डझनभर उपसचिवांपर्यंतच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्य़ात दौरे करून सरकारला सादर केलेला अहवाल आणि अहवालातील कटू वास्तव मुख्य सचिव स्वाधीन क्षेत्रीय यांनी मान्य केल्यावरतरी शेतकरी आत्महत्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.
‘चौकशी करणार ’
िपपरी बुटी येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी शांता प्रल्हाद ताजने हिच्यापर्यंत मदत का पोहोचली नाही याची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपुरात प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.