बीड – संचारबंदीत गावाकडे परतणाऱ्या ऊसतोड मजूरांवर पोलीसांनी मारहाण केल्यानंतर मदतीला गेल्याने गुन्हा दाखल केला. अशा प्रकारचे हजार गुन्हे मी अंगावर घ्यायला तयार आहे. मला अटक करा, जामीनसुद्धा घेणार नाही,असे आव्हान भाजप आमदार सुरेश धस यांनी सरकारला दिले. ऊसतोड मजुरांना वाऱ्यावर सोडणाऱ्या साखर कारखानदारांनवर कारवाई का नाही असा प्रश्नही त्यांनी केला.

बीड जिल्ह्यातील, भाजप आ.सुरेश धस यांनी जिल्हा बंदीत हद्द ओलांडली, संचारबंदीच्या नियमाने उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.याबाबत शनिवार दि.4 एप्रिल रोजी आ.सुरेश धस यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडणी.धस, म्हणाले दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्या लवादामध्ये कारखाने बंद झाल्यानंतर ऊसतोड मजूरांना घरी सोडण्यापर्यंतची जबाबदारी कारखान्यांची असा करार आहे. मग संचारबंदीत हा नियम लागू होत नाही का? तीन – तीन जिल्हे ओलांडून हे कामगार परतले मग तिथले प्रशासन काय करत होते? त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. गावाकडे परत नाही ऊस तोडणी मजूर यांना मारहाण करणे हे कोणत्या नियमात आहे ते काय गुन्हेगार आहेत का? त्यांना मदत करणे गुन्हा असेल तर ऊसतोड मुजरांसाठी हजारो गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहे.ऊसतोडणी मजुरांच्या मदतीला गेलो तर म्हणून प्रशासनाने गुन्हा दाखल केला.

आता अटक करावीच, जामीन सुद्धा घेणार नाही असे आव्हान आ.धस यांनी सरकारला दिले. सरकार अत्यावश्यक वस्तू अधिनियमनुसार साखर कारखाने सुरु ठेवत आहेत. सद्यस्थितीत कोरोनामुळे संपूर्ण देश बंद असताना ऊसतोडणी मजूरांना बळजबरीने कामाला लावले जात आहे.हा त्यांच्या जिविताशीच खेळण्याचा प्रकार असुन तेही माणसच आहेत याचे भान ठेवावे. करोना बाधित रुग्ण आढळलेल्या भागातील कारखाने साखर कारखाने सुरु आहेत, मग मजूरांमध्ये सामाजिक अंतर आहे का? कारखान्यावर हजारो कामगार आहेत हे कोणी लक्षात घेत नाही. केवळ दरांमध्ये 50 रुपये वाढवून देऊ आणि किराणा देऊन मजूरांची बोळवण केली जाते. सरकारने आरोग्य कर्मचारी , पोलीस कर्मचारी यांचा 50 लाखाचा विमा उतरविण्यात तसा ऊसतोड कामगारांचा देखील 50 लाख रुपयांचा विमा कारखारदारांनी उतरविला पाहिजे अशी मागणीसुद्धा आ. धस यांनी केली.

‘ चुप बैठो नही तो कान काटूंगा ‘ सरकारच्या या भूमिकेला कायम विरोध
कोरोना मुळे देशातील सर्व उद्योगधंदे बंद असताना साखर कारखाने मात्र सुरू आहेत. अनेक ठिकाणी मजुरांना पोलिसांकरवी मारहाण करून कामावर थांबून घेतले जात आहे. ऊसतोड मजुरांची अर्धे कुटुंब गावात तर अर्धे कारखान्यावर आहे. परतणाऱ्या ऊसतोड मजुरांना रस्त्याने पोलीस मारहाण करत आहेत.याला जबाबदार कारखान्यांवरही गुन्हे दाखल करा. मजुरांच्या मदतीला गेलो म्हणून गुन्हा दाखल केला.हा प्रकार ” चुप बैठो नही तो कान काटूंगा ‘”असा असुन सरकारच्या चुकीच्या भूमिकेला कायम विरोध करणार असा इशारा सुरेश धस यांनी दिला.