महाविकास आघाडी-भाजप यांच्यात चुरस; उद्या मतमोजणी

पुणे, नागपूर, औरंगाबाद : नागपूर, औरंगाबाद आणि पुणे पदवीधर या मतदारसंघांच्या निवडणुकीत विक्र मी मतदान झाले. गतवेळच्या तुलनेत मतदानात मोठय़ा प्रमाणावर वाढ नोंदविण्यात आली. पुणे शिक्षक मतदारसंघात गतवेळच्या तुलनेत ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये तर जवळपास ८३ टक्के  मतदान झाले.

नागपूर, पुणे आणि औरंगाबाद पदवीधर तसेच पुणे व अमरावती शिक्षक अशा पाच मतदारसंघांमध्ये मंगळवारी मतदान झाले. याशिवाय धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेची पोटनिवडणूकही पार पडली. सर्व सहाही मतदारसंघांतील मतमोजणी गुरुवारी होणार आहे. मतमोजणी ही पसंतीक्र मानुसार के ली जात असल्याने निकाल जाहीर होण्यास दुसरा दिवस उजाडेल, अशीच चिन्हे आहेत.

करोनाच्या पाश्र्वभूमीमुळे मतदानाला कसा प्रतिसाद मिळेल, याबाबत राजकीय पक्ष साशंक होते. परंतु, सर्वच मतदारसंघांमध्ये मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात प्राथमिक अंदाजानुसार ६२ टक्के मतदान झाले. गत वेळी ३७ टक्के मतदान झाले होते.

पुणे शिक्षक मतदारसंघात गेल्या वेळी अवघे तीन टक्के  मतदान झाले होते. यंदा ७० टक्के  मतदान झाले. पुणे पदवीधर मतदारसंघामध्येही ५० टक्के  मतदान झाले. गेल्या वेळी २२ टक्यांच्या आसपास मतदान झाले होते. पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला.

विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत सरासरी ५५ टक्के मतदान झाले.  मतदानाची ही टक्केवारी २००८ आणि २०१४ च्या निवडणुकीपेक्षा अधिक आहे. २००८  मध्ये ५२.५५ तर २०१४ मध्ये ३७ टक्के मतदान झाले होते.

मोठय़ा प्रमाणात नवीन मतदारांची नोंदणी झाल्याने मतदान वाढले. याचा फायदा भाजपलाच होईल. मतदार यादीतून अनेक नावे गहाळ झाली, अन्यथा मतदान ७० टक्के झाले असते, अशी प्रतिक्रि या भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांनी व्यक्त के ली. वाढीव मतदान सकारात्मक परिणाम करणारे ठरेल. आम्ही याकडे परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून बघतो. मोठय़ा संख्येने मतदार नोंदणी केली होती. त्याचे प्रतिबिंब मतदानात दिसून  आले. ग्रामीण भागातही चांगले मतदान झाले, असे काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांनी सांगितले. अमरावती शिक्षक मतदारसंघात तर ८३ टक्यांच्या आसपास मतदान झाले. शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत एवढा प्रतिसाद कधीच मिळत नाही.

औरंगाबाद पदवीधर – ६१.०८ टक्के

पुणे पदवीधर – ५०.३० टक्के

नागपूर पदवीधर – ५४.७६ टक्के

अमरावती शिक्षक – ८२.९१ टक्के

पुणे शिक्षक – ७०.४४ टक्के