राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हळहळू समोर येऊ लागले आहे. अनेक ठिकाणी सत्तांतर होताना दिसत असून, अनेक मातब्बर नेत्यांना ग्रामपंचायतीही राखता आल्या नसल्याचं चित्रं आहे. कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या राम शिंदे यांचा पराभव करणाऱ्या आमदार रोहित पवार यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतही शिंदे यांना धक्का दिला आहे.

आणखी वाचा- Gram Panchayat Results : परळीत धनंजय मुंडेंच्या गटाचा दणदणीत विजय

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाच्या राम शिंदेंविरुद्ध रोहित पवार यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी रोहित पवार यांनी राम शिंदे यांना मोठा धक्का देत विजय मिळवला होता. आमदार झाल्यापासून रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केलं होतं. त्याचे परिणाम हळूहळू दिसून येत आहे. राम शिंदे यांच्या गावातही रोहित पवार यांच्या गटाचा विजय झाला आहे. राम शिंदे यांच्या चौंडी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत रोहित पवार यांचा गट विजयी झाला आहे. चौंडी ग्रामपंचायतीतील ९ पैकी ७ जागांवर रोहित पवार यांच्या गटानं विजय मिळवला आहे. तर राम शिंदे यांच्या गटाला २ जागा मिळाल्या आहेत.

आणखी वाचा- Gram Panchayat Results : राणेंना शिवसेनेचे दे धक्का; तीन पैकी दोन जागी भगवा

नगरमध्ये विखेंना मोठा धक्का; २० वर्षांची सत्ता गमावली

अहमदनगरमध्ये लोणी (खुर्द) हे भाजपा आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांचं गाव आहे. या गावातील ग्रामपंचायतीवर गेल्या २० वर्षांपासून विखे-पाटलांची सत्ता होती. मात्र, या ग्रामपंचायतीच्या १७ पैकी १३ जागा जिंकून परिवर्तन पॅनलने विखे-पाटलांना धोबीपछाड दिला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील हे खासदार आहेत. असं राजकीय बळ असतानाही विखे-पाटलांना पराभव पत्करावा लागला आहे.