01 March 2021

News Flash

शेतीच्या वादातून आजीचा खून, नातवाला अटक

जमीन वाटणीच्या कारणावरून नातवाने आजीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. हिंगोली तालुक्यातील चिंचाळा येथे हा प्रकार घडला. िहगोली ग्रामीण पोलिसांनी रमेश आनंदा घोंगडे या

| June 25, 2014 01:53 am

जमीन वाटणीच्या कारणावरून नातवाने आजीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. हिंगोली तालुक्यातील चिंचाळा येथे हा प्रकार घडला. िहगोली ग्रामीण पोलिसांनी रमेश आनंदा घोंगडे या आरोपीला अटक केली.
चिंचाळा येथे शेतजमीन वाटणीवरून आरोपी घोंगडे व त्याचे वडील आनंदा घोंगडे यांच्यात वाद सुरू आहे. चिंचाळा शिवारातील आखाडय़ावर हे कुटुंब राहते. आरोपी रमेश हा वडिलांकडे जमीन वाटून देण्याची मागणी अनेक दिवसांपासून करीत होता, याच कारणावरून दोघांत वाद झाला. रमेशने शुक्रवारी वडिलांना मारहाण केली. वडिलांच्या तक्रारीवरून रमेशविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. आनंदा घोंगडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सोमवारी रात्री शेतात रमेश, त्याची आजी बायजाबाई घोंगडे व शेतात कामाला असलेला पांडू मुके तिघे मुक्कामी होते. रात्रीच्या वेळी रमेशने आजीसोबत वाद सुरू केला व त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. या वेळी भांडण सोडविण्यासाठी पांडू मुके मध्ये पडला असता त्यालाही मारहाण झाली. रमेश इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने आजी बायजाबाई यांच्या डोक्यात दगड घालून खून करून पसार झाला.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ठोंबळ, जमादार गंगावणे यांच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली व शेतात लपून बसलेल्या रमेशचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. रमेशविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2014 1:53 am

Web Title: grandmother murder grandson arrest
Next Stories
1 शतकोटीचा बोजवारा, आता ग्रुपिंगची लगबग!
2 प्राध्यापकांचे निवृत्तीचे वय वाढवू नये-विखे
3 पीककर्जासह अन्य मागण्यांसाठी जिंतूरला भांबळे यांचे ‘रास्ता रोको’
Just Now!
X