News Flash

पालकमंत्री जाहीर; आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई उपनगरची जबाबदारी

अजित पवार पुण्याचे पालकमंत्री

मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या पालकमंत्री म्हणून नियुक्त्या केल्या. बुधवारी रात्री ही यादी जाहीर करण्यात आली. आदित्य ठाकरे यांच्यावर मुंबई उपनगरची जबाबदारी देण्यात आली असून, अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरचं पालकमंत्रीपद बाळासाहेब थोरात यांच्याकडे, तर हसन मुश्रीफ यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

जिल्हा आणि पालकमंत्री

पुणे– अजित अनंतराव पवार

मुंबई शहर– अस्लम रमजान अली शेख

मुंबई उपनगर– आदित्य उद्धव ठाकरे

ठाणे– एकनाथ संभाजी शिंदे

रायगड – आदिती सुनिल तटकरे

रत्नागिरी– ॲड. अनिल दत्तात्रय परब

सिंधुदुर्ग– उदय रविंद्र सामंत

पालघर– दादाजी दगडू भुसे

नाशिक– छगन चंद्रकांत भुजबळ

धुळे– श्री. अब्दुल नबी सत्तार

नंदुरबार– ॲड. के.सी. पाडवी

जळगाव– गुलाबराव रघुनाथ पाटील

अहमदनगर– हसन मियालाल मुश्रीफ

सातारा– शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील

सांगली– जयंत राजाराम पाटील

सोलापूर– दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील

कोल्हापूर– विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

औरंगाबाद– सुभाष राजाराम देसाई

जालना– राजेश अंकुशराव टोपे

परभणी– नवाब मोहम्मद इस्लाम मलिक

हिंगोली– वर्षा एकनाथ गायकवाड

बीड– धनंजय पंडितराव मुंडे

नांदेड– अशोक शंकरराव चव्हाण

उस्मानाबाद– शंकरराव यशवंतराव गडाख

लातूर– अमित विलासराव देशमुख

अमरावती– ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर

अकोला– ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

वाशिम– शंभुराज शिवाजीराव देसाई

बुलढाणा– डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे

यवतमाळ– संजय दुलीचंद राठोड

नागपूर– डॉ. नितीन काशिनाथ राऊत

वर्धा– सुनिल छत्रपाल केदार

भंडारा– सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील

गोंदिया– अनिल वसंतराव देशमुख

चंद्रपूर– विजय नामदेवराव वडेट्टीवार

गडचिरोली– श्री. एकनाथ संभाजी शिंदे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 9:09 pm

Web Title: guardian minister name announced by chief minister of maharashtra bmh 90
Next Stories
1 दिग्गज नेते असलेल्या नागपुरातच भाजपाचा पराभव झाला -जयंत पाटील
2 यवतमाळमध्ये भाजपा-शिवसेना नेत्यांमध्ये राडा
3 तानाजी सावंत यांची पक्षविरोधी भूमिका, भाजपाशी केली जवळीक
Just Now!
X