13 December 2017

News Flash

गुजरातपेक्षा महाराष्ट्राच्या गाठीला मागणी

पंढरपुरात गाठी बनविण्याची लगबग अंतिम टप्प्यात

वार्ताहर, पंढरपूर | Updated: March 21, 2017 1:43 AM

पंढरपूर येथील साखरेचा हार बनविण्याच्या कारखान्यात कारागिरांची लगबग.

पंढरपुरात गाठी बनविण्याची लगबग अंतिम टप्प्यात

मराठी नववर्षांचा पहिला दिवस हा ‘चत्री पाडवा’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संकल्पाची, मांगल्याची, समृद्धीची, नवचतन्याची गुढी उभी केली जाते. या गुढीला साखरेचा हार, गाठी घालण्याचीही परंपरा आहे. पंढरपुरात गुढीसाठी सध्या साखरेच्या गाठी बनविण्याच्या कारखान्यात लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेच्या दारात वाढ झाल्याने यंदा साखरेच्या गाठी महाग होणार आहेत. तर बाजारात गुजरातच्या गाठीपेक्षा महाराष्ट्राच्या गाठीला मागणी जास्त असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

हिंदू परंपरेनुसार नवीन वर्ष चत्र महिन्याने सुरू होते. चत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात चत्री पाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तापकी एक मुहूर्त म्हणूनही याकडे पाहिले जाते. या चत्री पाडव्याला घरोघरी गुढी उभ्या केल्या जातात. मांगल्याचे, समृद्धीचे प्रतीक म्हणून गुढी उभी केली जाते. या गुढीला साखरेचा हार किंवा साखरेची गाठ बांधण्याची परंपरा आहे. या साखरेच्या गाठी बनविण्याचे पंढरपुरात कारखाने आहेत. या कारखान्यात गेल्या काही दिवसांपासून याची लगबग सुरू आहे. साधारणपणे छोट्या गाठी पासून ते पाच किलोच्या गाठी बनविल्या जातात.

साखरेचा पाक तयार करून त्याला घोटवून ज्या साच्यात बनवायचे आहे. त्यामध्ये हा साखरेचा पाक ओतला जातो. त्या साच्याला वेगवेगळा आकार आणि किती वजनाचा करायचा आहे, त्या आकारमानात बनविला जातो. यामध्ये चंपाकळी, पिंपळपान, कैरीपान आदी आकारात या गाठी बनविल्या जातात. या साखरेच्या गाठी बनविताना ढोबळमानाने १०० किलो साखरेत ९५ किलोच्या साखरेच्या गाठी तयार होतात. एका कारखान्यात किमान ६ ते ७ कामगारांना रोजगार या निमित्त मिळतो. या कारखान्यातील तयार झालेल्या साखरेच्या गाठी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. असे जरी असले, तरी नव्या वर्षांत संकल्पाची गुढी उभी करण्यासाठी साखरेची गाठ बांधावी लागती हेही विसरून चालणार नाही.

गाठीच्या दारात थोडी वाढ

बाजारात सध्या गुजरातच्या साखरेच्या गाठी आली आहेत. या गाठी मशीनवर बनविल्या जातात. जाड असून वजनाला भारी असतात. मात्र त्या गुढीवर उभे करताना अडचण होते. त्या तुलनेत आपल्या इथे बनविल्या जाणाऱ्या गाठी या पारंपरिक आणि हाताने बनविल्या जातात. त्यामुळे आपल्या गाठीला मागणी जास्त आहे. यंदाच्या वर्षी साखरेचा दर वाढल्याने गाठीच्या दारात थोडी वाढ झाली आहे असे गेल्या तीन पिढीपासून हा व्यवसाय करणारे विवेक कटकमवार यांनी सांगितले.

First Published on March 21, 2017 1:43 am

Web Title: gudi padwa sweet food items