News Flash

हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर गृहविभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

करोनामुळे सर्वधर्मीय सण, उत्सव व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत

संग्रहीत छायाचित्र

हनुमान जयंती उत्सव राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात व उत्साहाने साजरा केला जातो. परंतु, करोना परिस्थितीच्या अनुषंगाने यावर्षी दि. २७ एप्रिल, २०२१ रोजीचा हनुमान जयंती उत्सव नागरिकांनी साधेपणाने आपापल्या घरीच साजरा करावा, असे आवाहन गृह विभागाकडून करण्यात आले आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत.

करोना स्थितीत सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या अतिसंसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता व वाढत्या कोविड रुग्णांच्या संख्येचा विचार करता महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या १३ एप्रिल, २०२१ च्या आदेशामधील मुद्दा क्र. १,२,७ व १० मध्ये नमूद तरतुदींच्या अधिन राहून या वर्षी हनुमान जयंती उत्सव साजरा करणे आवश्यक आहे, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.

या अनुषंगाने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपापल्या घरी हनुमान जयंती उत्सव साजरा करावा. करोना प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. यावर्षी मंदिरात भजन, किर्तन, पठण इत्यादींचे किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे सार्वजनिक आयोजन करण्यात येऊ नये. मंदिरामधील व्यवस्थापक, विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केबल नेटवर्क, वेब साइट व फेसबुक आदींद्वारे उपलब्ध करून द्यावी. हनुमान जयंती उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढू नयेत.

तसेच, करोनाच्या अनुषंगाने शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग व संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे देखील त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 7:43 pm

Web Title: guidelines issued by home department on the backdrop of hanuman jayanti msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्रासाठी १६६१ मेट्रिक टन ऑक्सिजन उचलण्यास केंद्राची मंजुरी!
2 चंद्रकांत पाटील तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे? – नाना पटोले
3 धक्कादायक : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून रुग्णाचा मृतदेह गहाळ!
Just Now!
X