News Flash

पोलीस ठाण्यातून १५ लाखांचा गुटखा पळवला

दोन चोरटय़ांनी पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्याच्या ट्रकमधून गुटखा चोरण्याचा सपाटा लावला होता.

(संग्रहित छायाचित्र)

विरार : सध्या तंबाखू ,गुटखा, सिगारेट यांची तिप्पट चौपट भावाने काळ्याबाजारात विक्री केली जात आहे. यामुळे नालासोपारा येथील दोन चोरांनी चक्क पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्यावरच हात साफ करत १५ लाखांहून अधिकचा माल चोरला. यात नालासोपारा पोलिसांनी दोन चोर आणि एक खरेदी करणाऱ्याला अटक केली आहे.

सध्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीत पोलीस ठाण्यातील बहुतांश पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असल्याचा फायदा घेत दोन चोरटय़ांनी पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्याच्या ट्रकमधून गुटखा चोरण्याचा सपाटा लावला होता. हा ट्रक पोलीस ठाण्याच्या आवारात मागच्या बाजूला ठेवला होता. १४ एप्रिल रोजी दुपारी अचानक एका पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्याची गोणी घेऊन जात असल्याचे पाहिले त्यानंतर हा सारा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महमद हकीब शेख (२२), आणि त्याचा १७ वर्षीय साथीदार हे दोघेही पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला असलेल्या डांगेवाडीतील रहिवाशी आहेत. यांची आधीचीच गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे. या चोरटय़ांनी पोलीस ठाण्यात कर्मचारी कमी असल्याचा फायदा घेत दररोज एक दोन गोणी प्रमाणे अशा प्रमाणे तब्बल १५ लाख ४५ हजार ६०० रुपयांचा माल लंपास केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 2:46 am

Web Title: gutkha worth rs 15 lakh stolen from police station zws 70
Next Stories
1 अखेर १४ तासानंतर मृतांच्या नातेवाईकांची सुटका!
2 घरच्या घरी केस कापण्याचा प्रयोग
3 उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई..!
Just Now!
X