News Flash

घरच्या घरी केस कापण्याचा प्रयोग

टाळेबंदी ३ मेपर्यंत कायम ठेवल्याने केस कर्तनालये उघडण्याची शक्यता नाही.

पालघर : केशकर्तनालये बंद असल्याने टाळेबंदीत घरच्याघरी केस कापण्याकडे तरुणांचा कल असल्याचे पाहावयास मिळत आहे. हातात कात्री, कंगवा व आरसा घेऊन एकमेकांचे केस कापत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून टाळेबंदी आहे. याला २१ दिवस झाल्याने अनेकांची केस-दाढी वाढली आहे. दाढी घरीच करता आली असली तरी प्रत्येकाकडे केस कापण्याचे कौशल्य नसल्याने मित्रांची मदत घेऊन एकमेकांचे केस कापवून घेतले जात असल्याचे दिसत आहे.

आता टाळेबंदी ३ मेपर्यंत कायम ठेवल्याने केस कर्तनालये उघडण्याची शक्यता नाही. ज्येष्ठांसह तरुण पिढीने नाईलाजाने घरीच केस कापण्याचा कल वाढला आहे. संचारबंदीत घरच्याघरी दाढी करण्याबरोबर आता घरच्याघरी केस कापण्याचाही पर्याय नागरिकांनी निवडलेला आहे. तर केस कर्तनालये सुरू होईपर्यंत अनेकांनी दाढी, केस वाढवण्यावर भर दिला आहे.

टाळेबंदीत ग्रामीणबहुल भागत खेडोपाडय़ांत तरुण तसेच ज्येष्ठांनी एकमेकांच्या मदतीने घरच्याघरी केस कापून घेतले आहेत. संचारबंदी लागू झाल्याने वाढलेली केस व दाढी कापायची सुविधा उपलब्ध नसल्याने मित्रांची मदत घेऊन आधी असलेल्या केसांप्रमाणे केस कापण्याचा अनोखा प्रकार व प्रयोग हे तरुण करीत आहेत. या प्रयत्नात प्रयोग यशस्वी झाला तर त्याला विशिष्ट कट असे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 2:40 am

Web Title: hair cutting experience at home by youths in lockdown zws 70
Next Stories
1 उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई..!
2 राजापूरच्या गंगेचे वर्षांच्या आतच आगमन
3 शेतमाल वाहतुकीसाठी रेल्वे मालगाडय़ांची मदत
Just Now!
X