23 January 2020

News Flash

खुनासह २१ गुन्ह्य़ांत कर्नाटकातून फरारी झालेल्या सराईताला अटक

सय्यद बाबर ऊर्फ सय्यद सिकंदर हबीब असे आरोपीचे नाव असून तो कर्नाटकातील रायचूर येथील राहणारा आहे.

संग्रहित

सोलापूर : कर्नाटक पोलिसांनी खुनासह विविध २१ गंभीर गुन्ह्य़ांमध्ये हव्या असलेल्या एका आरोपीला सोलापुरात पोलिसांनी जेरबंद केले. या आरोपीला पकडण्यासाठी यापूर्वी कर्नाटक पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. सोलापूर एसटी बसस्थानकावर संशयास्पदरित्या फिरताना तेथील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तेव्हा तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले.

सय्यद बाबर ऊर्फ सय्यद सिकंदर हबीब असे आरोपीचे नाव असून तो कर्नाटकातील रायचूर येथील राहणारा आहे. त्याच्यावर रायचूर उत्तर पोलीस ठाण्यासह इतर काही पोलीस ठाण्यांमध्ये खून केल्याचा एक गुन्हा तसेच प्राणघातक हल्ला केल्याचे दोन गुन्हे आणि घरफोडय़ांचे व जबरी चोऱ्यांचे १८ गुन्हे नोंद आहेत.

फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी एसटी बसस्थानक परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी एक तरूण संशयास्पदरित्या फिरताना दिसून आला. सय्यद बाबर ऊर्फ सय्यद सिकंदर हबीब असे त्याचे नाव निष्पन्न झाले. राचयूर भागात त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने बेर लक्ष्मण नावाच्या व्यक्तीचा निर्घृणपणे खून केला आणि नंतर तो फरारी झाला होता. त्याच्या विरोधात इतर गंभीर गुन्हे आहेत. त्याला पकडण्यासाठी एकेदिवशी कर्नाटक पोलिसांनी सय्यद बाबर यास पकडण्याचा प्रयत्न केला असता तो निसटून गेला. त्यावेळी पोलिसांनी हवेत गोळीबार करूनदेखील तो पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी ही माहिती दिली.

First Published on July 16, 2019 2:12 am

Web Title: hard criminal abscond from karnataka arrested by solapur police zws 70
Next Stories
1 कास पठारावर फिरण्यासाठी आता जांभ्या दगडातील पायवाटा
2 गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘जादूटोणाविरोधी कायद्याचा’ समावेश
3 परस्परांचे कडवे विरोधक विमानात सख्खे शेजारी
Just Now!
X