19 September 2020

News Flash

ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर यांचे निधन

गेल्या काही दिवसापासून पंडित तुळशीदास बोरकर हार्नियाच्या त्रासाने त्रस्त होते.

पं.तुळशीदास बोरकर (संग्रहित छायाचित्र)

पद्मश्रीपुरस्कार विजेते गोव्याचे ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर (८४) यांचे आज (शनिवारी) निधन झाले. मुंबई येथील नानावटी रुग्णालयामध्ये उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सोलो हार्मोनियम वादनातील एक आदर्श व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसापासून पंडित तुळशीदास बोरकर हे हार्नियाच्या त्रासाने त्रस्त होते. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना परत घरीदेखील आणण्यात आलं होतं. मात्र पंधरा दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास सुरु झाला. त्यामुळे त्यांना  नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी त्यांना टीबी झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

गोव्यातील बोरी या गावामध्ये १८ नोव्हेंबर १९३४ साली तुळशीदास बोरकर यांचा जन्म झाला होता. मात्र ते गोवा सोडून पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांनी मधुकर पेडणेकर यांच्याकडून हार्मोनियम वादनाचे धडे गिरविली. त्यासाठी त्यांना रोज मुंबई- पुणे असा प्रवास करावा लागत असे. विशेष म्हणजे या त्यांना या कारकिर्दीत उस्ताद आमीर खान, पंडित भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व आदी कलावंतांना साथ केली. शास्त्रीय संगीतातील त्यांच्या योगदानाबद्दल २०१६ साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं.

दरम्यान, तुळशीदास बोरकर यांच्या निधनावर अनेक स्तरामधून शोक व्यक्त करण्यात येत असून सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. पद्मश्री पुरस्कार आणि वादय संगीतासाठी संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळालेले गोव्याचे ज्येष्ठ हार्मोनियम वादक पंडीत तुळशीदास बोरकर यांच्या निधनाने संगीतातला एक स्वर निखळला आहे, असे मंत्री विनोद तावडे यांनी त्यांच्या शोक संदेशात म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2018 1:14 pm

Web Title: harmonium player pt tulsidas borkar passed away
Next Stories
1 Sui Dhaaga box office collection day 1 : जाणून घ्या, ‘सुई धागा’ची पहिल्या दिवसाची कमाई
2 कंगनाच्या मणिकर्णिकाची ‘या’ दिवशी दिसणार पहिली झलक
3 Happy Birthday Prathmesh : जाणून घ्या, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या प्रथमेशविषयी
Just Now!
X