शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राज्य सरकारच्या कामकाजावर चिडून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिलेला राजीनामा परत घेत असल्याचे पत्र शनिवारी दिले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत घातली असल्याचे त्यांनी सांगितले. विकासकामांच्या चाव्या भाजपच्या हातात आहेत, त्यात शिवसेनेच्या नेत्यांना काही करण्यासारखे राहिले नाही. मात्र, भविष्यात शिवसेना वाढीसाठी राजीनामा देऊ नये असे ठाकरे यांनी सांगितल्याने राजीनामा परत घेण्याबाबतचा पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले.

सरकार जरी युतीचे असले तरी कन्नड मतदारसंघातील कामे होत नसल्याचा आरोप करत त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सादर केला होता. राजीनामा परत घेण्याबाबतची संधी देऊ, असे तेव्हा बागडे यांनी सांगितले होते.