News Flash

महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळेच चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन ढासळले – हसन मुश्रीफ

चंद्रकांत पाटील यांना दोनदा मोठी संधी मिळूनही त्याचा राज्याला तर सोडाच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही उपयोग झालेला नाही.

संग्रहीत छायाचित्र

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी टीका केली. ‘महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळेच आमदार चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. डोक्यावर परिणाम झाल्यासारखे ते वेड्यासारखे बडबडत आहेत, अशा शब्दात हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.

चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा मुश्रीफ यांनी आजरा येथे झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रचार मेळाव्यात खरपूस समाचार घेतला. मुश्रीफ म्हणाले की “‘बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला. देशाचे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. चंद्रकांत पाटील यांना काहीही न करता दोनदा मोठी संधी मिळूनही त्याचा राज्याला तर सोडाच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही उपयोग झालेला नाही.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 7:30 pm

Web Title: hasan mushrif slam bjp state president chandra kant patil dmp 82
Next Stories
1 चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भातील विधानाचा भाजपाकडून तीव्र निषेध
2 पुन्हा लॉकडाऊन होणार? या प्रश्नावर अजित पवार म्हणतात….
3 नाशिक जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंदच राहणार – छगन भुजबळ
Just Now!
X