गणेश चतुर्थी हा उत्सव प्रत्येकाच्या ह्रदयाशी जोडलेला आहे. अशी श्रद्धा आहे की, कला, विज्ञान व शहाणपणाची देवता गणेश त्याच्या वाढदिवशी पृथ्वीवर भक्तांना आशिर्वाद देण्यासाठी येते. हा उत्सव सगळ्यांना एकत्र आणतो आणि देशभरात अत्यंत उत्साहानं साजरा केला जातो. यादिवशी लोकं आपसातले मतभेद विसरतात आणि भक्तिनं उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतात. विशेषत: महाराष्ट्रामध्ये ज्या उच्च स्तरावर हा उत्सव साजरा करण्यात येतो ते अतुलनीय आहे कारण ठिकठिकाणी शोभनीय असे मंडप उभारलेले असतात.

आपला मंडप सगळ्यात चांगला दिसावा असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे ते शक्य तितका तो आकर्षक करतात. काही ठिकाणी तर गणरायाच्या अत्यंत आकर्षक अशा मूर्ती असतात. काही ठिकाणी डोळे दिपवतील अशी प्रकाशयोजना असते तर काही ठिकाणी भक्तिरसपूर्ण सुंदर गाणी वाजवली जातात. रंग, प्रकाश, फटाके आणि बरंच काही अशी मजा असते. या मंडळांमध्ये सगळ्यात प्रसिद्ध अशा मंडळामध्ये गणना होते लालबागच्या राजाची. दरदिवशी सुमारे दहा लाख भाविक लालबागच्या राजाला भेट देतात.

यावर्षी हॅवेल्सनं लालबागच्या राजाला #HavellsKeDeva या हॅशटॅगसह आणखी थोडं रंजक केलं. हॅवेल्सनं 2,160 मीटर लांबीच्या अत्यंत मजबूत अशा वायर्सच्या सहाय्यानं गणरायाची आठ फुटी मूर्ती उभारली होती. या प्रकारातली ही पहिलीच मूर्ती असून तिचं वजन तब्बल 175 किलो होतं. ही मूर्ती सगळ्या जमावाच्या वर हवेत उंचावल्यामुळं प्रत्येकाला आश्चर्याचा धक्काच बसला होता!

मूर्तीचं दर्शन घेऊन पुढे जाताना प्रत्येकजण गुंग झाला होता. सोशल मीडियावर ज्यापद्धतीनं #HavellsKeDeva हा हॅशटॅग ट्रेंड झाला त्यावरूनही हे लक्षात येतं. वैशिष्ट्यपूर्ण सुरक्षा असलेली रचना व तिच्याभोवती असुरक्षितता व दौर्बल्याचं प्रतीक असलेला अग्नी होता. हा प्रसंग खाली बघा

गणेश आपल्या भक्तांचं ते संकटात असताना रक्षण करतो. संरक्षण व सुरक्षेला प्राधान्य हेच हॅवेल्सचंही ब्रीद आहे. आनंदी व सुरक्षित आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. भगवान गणेशाचे आशिर्वाद सदा तुमच्यावर राहोत! तुमच्या मार्गातली सगळी विघ्नं तो दूर करो व तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो!

(प्रायोजित)