पालघर : औद्योगिक वसाहतींमधील घातक व टाकाऊ रसायन निघणाऱ्या कारखान्यांमार्फत पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. या कंपन्यांशी हातमिळवणी करत काही रसायन माफिया सक्रिय असून हे घातक टाकाऊ रसायन मुंबई-अहमदाबाद महामार्ग परिसरात  अवैध पद्धतीने कुठेही सोडून दिला जात आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील गावांना  धोका निर्माण झाला.

मंगळवारी नांदगाव तर्फे मनोर येथे एका अज्ञात टँकरमार्फत हे घातक टाकाऊ रसायन एका नैसर्गिक नाल्यात सोडण्यात आले. ही घटना त्या पाडय़ातील नागरिकांनी पाहिली व त्यांनी त्या टँकरचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता टँकर चालकाने हा टँकर घेऊन पळ काढला. यादरम्यान रसायन सोडण्याचा वॉल उघडा राहिल्याने टँकरमधील घातक व टाकाऊ  रसायन  पसरत गेला. इतकेच नव्हे तर हे रसायन महामार्गावरही पसरल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

अवैध पद्धतीने रसायन टाकणाऱ्या  टँकर मालक व चालकावर मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र तरीही रसायन माफी या प्रशासनाची नजर चुकवून हे कृत्य करीत आहे, अशी घातक रसायने नैसर्गिक नाल्यांमध्ये तसेच पाणवठय़ाच्या जागेवर सोडल्यामुळेमुळे   आरोग्यास धोका तसेच   रसायन मिसळून भातशेती नुकसान  होण्याची भीती आहे.

अशा गैरप्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी व आळा घालण्यासाठी कर्मचारम्य़ांना सतर्क राहण्याची ताकीद दिली आहे.रात्र गस्त वाढविली असून चौकी तपासणी आणखी सक्तीची करण्यात येईल.असे संशयित वाहन किंवा रस्ता बदलणारे वाहन आढळून आल्यास त्यावर गुन्हे दाखल केले जातील.

-प्रताप दराडे, पोलीस निरीक्षक, मनोर