News Flash

GOOD NEWS : राज्यात दोन दिवसांत ७०० करोना रुग्णांना डिस्चार्ज

सव्वा महिन्यात सुमारे २ हजार ८१९ रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आलं आहे.

संग्रहीत छायाचित्र

देशात तसंच राज्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. असं असलं तरी करोनाच्या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्याही आता वाढत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये ७०० पेक्षा अधिक रुग्णांना घरी सोडलं असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात करोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ होत असल्याचेही ते म्हणाले.

उपचारानंतर सोमवारी ३५० जणांना तर मंगळवारी ३५४ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सलग दोन दिवसांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसंच सव्वा महिन्यात सुमारे २ हजार ८१९ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

“राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. साधारणत: मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडणं सुरू करण्यात आलं आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली आहे, असंही त्यांनी नमूद केलं. गेल्या दोन दिवसात राज्यात सर्वाधिक मुंबईतील ४६० रुग्ण घरी सोडण्यात आले. त्यापाठोपाठ पुणे मंडळातील २१३ रुग्णांना बरं करून घरी पाठविण्यात आलं आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 7:15 pm

Web Title: health minister rajesh tope says 700 corona patients discharge after medications highest numbers jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मी शिवसेना सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं- नारायण राणे
2 Lockdown: वर्धा, चंद्रपूरमधील हजारो परप्रांतीय मजूर विशेष रेल्वेने आपल्या राज्याकडे रवाना
3 ‘तुम्हालाच मुख्यमंत्री करणार’ या आश्वासनावर काँग्रेसमध्ये दहा वर्षे गेली – नारायण राणे
Just Now!
X