News Flash

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली करोना प्रतिबंधात्मक लस

मी लस घेतली आपणही घ्या! असे केले आहे आवाहन

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज(सोमवार) मुंबईतील जे जे रूग्णालयात करोना प्रतिबंधात्मक लस घेतली. यावेळी त्यांनी ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी आपले लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले आहे. याचबरोबर मी लस घेतली आपणही घ्या! असं टोपे म्हणाले आहेत.

कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण आवश्यक असून आतापर्यंत सुमारे १ कोटी २२१ लाख लाभार्थ्यांना लस देऊन महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे, १८ ते ४४ वर्षापर्यंतच्या नागरिकांचेही लसीकरण सुरू करावे, या मागणीचा पुनरुच्चार देखील यावेळी आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केला होता.

फेब्रुवारीमध्ये आरोग्यमंत्री टोपे यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र करोनावर मात करून ते पुन्हा कर्तव्यावर रुजूही झाले मात्र लगेच त्यांना लस घेता येणे शक्य नसल्याने त्यांनी आता दोन महिन्यानंतर लस घेतली. यावेळी त्यांनी लस देणाऱ्या परिचारिका, जे जे रूग्णालयाचे डॉक्टर यांचे आभार मानले.

मोठा निर्णय : १८ वर्षांवरील प्रत्येकाला करोनाची लस; १ मे पासून व्यापक लसीकरण मोहीम

दरम्यान,  करोना विरोधात देशाच्या सुरू असलेल्या लढाईच्यादृष्टीन केंद्र सरकारे आज एक मोठा व महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता १८ वर्षांवरील प्रत्येकाला करोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. १ मे पासून हे लसीकरण सुरू होणार आहे. याशिवाय लस उत्पादकांना ५० टक्के साठा राज्य सरकारला द्यावा, असे देखील सांगण्यात आले आहे. आज पंतप्रधानांची काही औषध कंपन्यांसोबत देखील बैठक झाली आहे. यामुळे आता लसीकरण मोहीमेस आणखी वेग येणार असल्याचे दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2021 10:57 pm

Web Title: health minister rajesh tope took the corona vaccine msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 गोकुळ निवडणुकीबाबत म्हणणे मांडण्याचे राज्य शासनाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2 पुतण्यामुळे आता फडणवीस अडचणीत?; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
3 लसीकरणबाबात केंद्र सरकारच्या नव्या निर्णयावर मुख्यमंत्री ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Just Now!
X