विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आली असून नागपुरात आज यावर्षीच्या सर्वाधिक ४६.७ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर चंद्रपूरात ४६.६ आणि अकोल्यात ४६.१ डिग्री तापमान नोंदविले गेले. चंद्रपुरात एका व्यक्तीचा उष्माघाताने बळी गेल्याचेही वृत्त आहे.

उन्हाळ्यात दरवर्षी नवतपा (सूर्य दरवर्षी पंधरा दिवसांसाठी रोहिणी नक्षत्रात येतो, यांपैकी सुरवातीचे नऊ दिवस जास्‍त गर्मीचे असतात) लागतो.  हा नवतपा आजपासून सुरू झाला आहे. त्याचा परिणाम उष्णता अधिक झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, आज चंद्रपूरमध्ये उष्माघाताने एकाचा मृत्यू झाला. चंद्रपूरमध्ये आज ४६.६ डिग्री तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील सालेझरी येथे अंकुश नायगमकर या मजुरांचा उष्मांघाताने मृत्यू झाला आहे.