News Flash

विजांच्या कडकडाटासह परभणीत धो-धो पाऊस

विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मंगळवारी सायंकाळी परभणी, जिंतूरमध्ये हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास बरसलेल्या पावसाने सर्वाचीच धांदल उडाली. अनेक गावांत वादळी वाऱ्याने घरावरील

| May 21, 2014 01:55 am

विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मंगळवारी सायंकाळी परभणी, जिंतूरमध्ये हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास बरसलेल्या पावसाने सर्वाचीच धांदल उडाली. अनेक गावांत वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले. परभणीत अक्षरश: धो-धो कोसळणाऱ्या पावसाचे विजेच्या कडकडाटासह रात्री उशिरापर्यंत थमान सुरूच होते. वैशाख वणव्यात सातत्याने पडणाऱ्या पावसाने कहर केला.
फेब्रुवारी-मार्चमधील गारपिटीनंतर सातत्याने अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. भर उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे उन्हाळा की पावसाळा, असा प्रश्न निर्माण झाला. मंगळवारी नेहमीप्रमाणे वैशाखातील ऊन तापले होते. पारा ४२ अंशाच्या पुढे होता. कडक उन्हासोबत उकाडय़ाने अंगाची लाही-लाही होत होती. अचानक सायंकाळी पाचच्या सुमारास वातावरणात बदल झाला. विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्याने हजेरी लावली.
जिंतूर शहर व परिसरात साडेपाचच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. सुमारे अर्धातास हा पाऊस पडला. बोरी, पुंगळा, अकोली, भोगाव भागातही जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्याने ग्रामीण भागात घरांवरील पत्रे उडाली. अनेक गावांत विजेच्या खांबांचे नुकसान झाले. स्त्यावरील झाडे पडली. काढणी सुरू असलेल्या भुईमुगाचे नुकसान झाले. परभणी शहरात सायंकाळी सातच्या सुमारास हजेरी लावली. पावसाच्या सोबतीला विजा व वादळ होते. विजांच्या कडकाडाटाने शहर हादरले. शहरात अर्धा तासाहून अधिक वेळ पडला. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 1:55 am

Web Title: heavily rain parbhani
टॅग : Parbhani
Next Stories
1 वाढीव पाणीपुरवठयासह परभणीच्या योजना मार्गी
2 काँग्रेसच्या १२ जि. प. गटात अशोक चव्हाण यांची पिछाडी
3 नाथ्रामध्ये मुंडेच पुढे, पुतण्याचा दावा फोल!
Just Now!
X