रत्नागिरी आणि संगमेश्वरमध्ये धुवाँधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे वशिष्ठी नदीच्या पुलावरची अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. संगमेश्वर चिपळूण या ठिकाणी बाजारपेठांमध्येही पाणी भरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. रत्नागिरी आणि इतर परिसरात मुसळधार पाऊस पडतो आहे. मराठवाड्यात पावसाने ओढ दिली आहे. मात्र कोकणात चांगला पाऊस पडतो आहे. आता पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला आहे की संगमेश्वर आणि चिपळूण येथील बाजारपेठांमध्येही पाणी भरले आहे. खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली त्यामुळेही मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे असेही समजते आहे.

मुंबईत जुलै महिन्याच्या सुरूवातीचा अपवाद वगळला तर पावसाच्या तुरळक सरी झाल्या आहेत. येत्या काही तासांमध्येही मुंबईत काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये तुरळक सरींचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.