19 September 2020

News Flash

सिंधुदुर्गात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस

मान्सून अद्याप केरळमध्ये दाखल झालेला नसला तरी सिंधुदुर्गात गुरुवारी पहाटे मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली.

मान्सून अद्याप केरळमध्ये दाखल झालेला नसला तरी सिंधुदुर्गात गुरुवारी पहाटे मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाटयाचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पहाटेच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळला. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, मालवण, वेंगुर्ला या भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. मागच्या तीन-चार दिवसात कोकणात मोठया प्रमाणावर तापमान वाढले होते.

अर्धा तास कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या या सरींमुळे काही भागांमध्ये निर्माण झालेला पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. सावंतवाडी, कणकवलीमध्ये सोसाटयाचा वारा, वीजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळला.

या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर आकेरी हेळ्याचे गाळू परिसरात एक मोठे झाड कोसळले. यामुळे कुडाळ-सावंतवाडी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. कणकवलीत पावसामुळे काही भागात वीज पुरवठा खंडीत झाला. मोबाइल सेवा ठप्प झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2019 8:27 am

Web Title: heavy rain in kokan sindhudurg
Next Stories
1 हिंदू मुख्यमंत्री, कश्मिरी पंडितांची घरवापसी अमित शाहंचा अजेंडा असेल तर ते राष्ट्रीय सत्कार्यच – उद्धव ठाकरे
2 बसमध्ये बाळास जन्म देऊन आई फरार
3 देशात आणखी एक लाख ‘डिजीटल व्हिलेज’ तयार होणार – संजय धोत्रे
Just Now!
X