राज्यात सर्वदूर पाऊसजोर वाढला असून सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्य़ात चालू महिन्यात पडत असलेल्या पावसामुळे मंगळवारी या दोन महिन्यांच्या सर्वसाधारण सरासरीच्या सव्वाशे टक्के पाऊस झाला आहे.

राज्यात पाऊसजोर!
‘जलयुक्त’ शिवारची यशकथा 

लाईव्ह अपडेटस:

* एकाचा मृतदेह सापडला; दोघांना वाचविण्यात यश; आणखी एकजण बेपत्ता
* कोल्हापूर- रेह होह परिसरात चारजण वाहून गेले
* पुणे – खडकवासला धरणाच्या पानलोट क्षेत्रात पाऊस सुरूच. रात्री २३ मिमी पाऊस झाल्याने धरण साठा अजुनही ९५ टक्के. मुठा नदीतून ९ हजार ३०० क्युसेक विसर्ग रात्रभर सुरूच आज दुपार पर्यंत पाऊस न थांबल्यास विसर्ग वाढविणार
* रत्नागिरी मार्गावर पाण्यात अडकलेल्या दोन ट्रकमधील ४ लोकांना अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि ‘जेजेएसएस’ या स्वयंसेवी संस्थेच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.
* नाशिक- कुंदेवाडी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन जणांची सुखरूप सुटका
*  गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस
* १३१ गावांना पुराच्या पाण्याचा धोका
* नरसोबाच्या वाडीचे दत्त मंदिर पाण्याखाली
* पुरामुळे कराड-चिपळूण मार्ग बंद
* पुण्याहून एनडीआरएफच्या ४० जवानांचे पथक ६ बोटींसह कोल्हापुरात दाखल
* एकूण ७२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
* जिल्ह्यातील ८० गावांशी संपर्क तुटला
* राधानगरी, शाहुवाडी, गगनबावडा परिसरात पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे.
* सातारा-सांगली जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
* खबरदारीचा उपाय म्हणून कोकणातून येणारी वाहतूक बंद