25 September 2020

News Flash

नगर शहरात सरींवर सरी

नगर शहर व परिसरात शुक्रवारी पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. पूर्वा नक्षत्रातील या पावसाने शहरातील वातावरणात आता चांगलाच बदल झाला असून, उष्णता कमी झाली आहे.

| June 13, 2015 03:30 am

नगर शहर व परिसरात शुक्रवारी पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. पूर्वा नक्षत्रातील या पावसाने शहरातील वातावरणात आता चांगलाच बदल झाला असून, उष्णता कमी झाली आहे.
शहर व परिसरात मान्सूनपूर्व पावसानेही चांगली हजेरी लावली. अनेक वर्षांनंतर प्रथमच यंदा शहरात दि. ७ जूनला पावसाने हजेरी लावली. त्यानंतर दररोज कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. शुक्रवारी सकाळपासूनच हवेतील उष्णता प्रचंड वाढली होती. अधूनमधून कडक ऊन पडत होते, मात्र आभाळ असतानाही आर्द्रतेमुळे कमालीच्या घामाच्या धारा सुरू होत्या.
शुक्रवारी दोनच्या सुमारास आकाशात काळय़ा ढगांची गर्दी होऊन चांगलेच अंधारले आणि हलक्या पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच त्याचा वेग वाढला व थेंबाचा आकारही वाढला. सुमारे अर्धा तास मुसळधार पावसाने शहर जलमय करून टाकले. पावसाचा वेग वाढल्यानंतर काही वेळेतच रस्त्यांवरून पाणी वाहू लागले व सखल भागात चांगलेच पाणी साचले. अधूनमधून पावसाचा वेग कमीजास्त होत होता. मात्र चार वाजेपर्यंत सरींवर सरी कोसळल्या. काही क्षणांची उसंत घेऊन पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारी साडेचारनंतर पावसाचा वेग मंदावला, मात्र हलकी भुरभुर सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होती.
जिल्हय़ात ग्रामीण भागात आता खरीप हंगामाचे वेध लागले असून, शेतीच्या मशागतीची कामेही पूर्ण झाली आहे. मात्र ग्रामीण भागात अजूनही मोठय़ा पावसाची प्रतीक्षा असून, त्यानंतरच खरिपाच्या पेरण्यांना खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. सलग दोन-तीन वर्षे खरिपात पावसाने ताण दिल्याने या पाश्र्वभूमीवर यंदा शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठय़ा अपेक्षा आहे. सध्याच्या कमी-अधिक पावसाने आशादायक वातावरण तयार झाले आहे.
नालेसफाई निविदेला अखेर मुहूर्त
नगर शहर व परिसरात मागच्या काही दिवसांत बऱ्यापैकी पाऊस झाला. मात्र सीना नदीपात्र व शहरातील नालेसफाईत मनहनगरपालिकेकडूनच हलगर्जी झाल्याने या पहिल्या पावसातच सांडपाण्याची समस्या अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. मुख्यत: पाण्याचा निचरा होत नसल्याने सखल भागात मोठय़ा मप्रमाणावर पाणी साचून राहते. मनपाने निविदेतील घोळामुळे या कामालाही विलंबानेच सुरुवात केली असून, दि. ६ जूनपर्यंत मागवलेल्या या कामाच्या निविदाही मनपाने विलंबाने म्हणजे शुक्रवारी उघडल्या. त्यानंतर आता या कामाची घाई सुरू झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 3:30 am

Web Title: heavy rain in nagar city 2
टॅग Heavy Rain
Next Stories
1 ‘मनपाचे उत्पन्न वाढण्यास प्राधान्य’
2 ‘आदिवासी शेतक ऱ्यांसाठी कृषी विद्यापीठ कार्य करील’
3 मराठवाडय़ातील बँकांकडून पीककर्जात हात आखडताच!
Just Now!
X