मुंबई प्रमाणे शेजारच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. पालघरच्या तलासरी आणि डहाणूमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर पाणी साचल्यामुळे वसई आणि पालघरच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गुजरातमध्येही अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.  पालघरमध्येही अनेक भागात पाणी साचले आहे.

 

जाणून घ्या पालघर जिल्ह्याच्या कुठल्या भागात किती पावसाची नोंद झाली.
वसई – १७३ मिमि
वाडा – १०१ मिमि
डहाणू – १७४.७ मिमि
पालघर -१४१.३ मिमि
जवाहर – १३० मिमि
मोखाडा – २७.६ मिमि
तलासरी – २१०.२ मिमि
विक्रमगड -१५२.५ मिमि

दरम्यान ठाण्याच्या सहयोग मंदिर, कल्पना सोसायटीमध्ये मुसळधार पावसामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने पंप लावून हे पाणी बाहेर काढले. पोखरण रोड भागातही संरक्षक भिंत कोसळली पण सुदैवाने यामध्ये जिवीतहानी झाली नाही.