28 February 2021

News Flash

पिंपरी चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, पाहा व्हिडिओ

गारांचा पाऊस झाल्याने पिंपरीकर सुखावले

प्रातिनिधिक छायाचित्र

पिंपरी-चिंचवड शहरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली यावेळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला.अचानक झालेल्या पावसाने पिंपरी चिंचवडकरांची चांगलीच त्रेधा उडाली. मागील दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

पाहा व्हिडिओ

गेल्या काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण होते.यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत होता.परंतु आज आलेल्या जोरदार पावसाने शहरवासीयांना चांगला दिलासा मिळाला आहे.वादळी वाऱ्यासह तब्बल अर्धा तास पाऊस झाला. यावर्षी केरळात दोन दिवस अगोदरच मान्सूनचा धडकला आहे.यामुळे महाराष्ट्रातील काही शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले .पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव,कासारवाडी,आकुर्डी,हिंजवडी,निगडी,भोसरी,या भागात गारांसह पाऊसाने हजेरी लावली.यावर्षी पाऊसाने वेळीच हजेरी लावल्याने शहरवासीय सुखावले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 5:08 pm

Web Title: heavy rain in pimpri chinchwad
Next Stories
1 भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण होत नसल्याने बीडच्या तरुणाची आत्महत्या
2 VIDEO: मोटरसायकलसोबत चालकाचीही टोईंग व्हॅननं काढली परेड, पुण्यातला प्रकार
3 मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण पुण्यात सर्वाधिक
Just Now!
X