रत्नागिरी जिल्ह्य़ात २४ तासांत एकूण ७५.७४ मिलीमीटर म्हणजेच सरासरी ८.४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच १ जून २०१५ पासून शनिवापर्यंत जिल्ह्य़ात ९८५९.६४ मिमी म्हणजेच सरासरी १०९५.५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्य़ात ११ जुल २०१५ रोजी तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे. आकडे मिलीमीटर मध्ये आहेत. मंडणगड-५, दापोली-२.१४, खेड-५.७१, गुहागर-६, चिपळूण-७.७७, संगमेश्वर-५.७५, रत्नागिरी-५.५४, लांजा-१२.२० आणि राजापूर तालुक्यात २५.६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नसíगक आपत्ती नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात गयाळवाडी वरदविनायक अपार्टमेंट येथे केबल जळाल्याने लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. तेथील नुकसानीचा अहवाल प्राप्त झाला नाही. गुहागर येथे मोरी खचली आहे. मात्र वाहतूक सुरळीत चालू असल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.