News Flash

नगरमध्ये जोरदार पाऊस, सीना नदीही वाहू लागली

नगर शहरात आज, रविवारी पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून सुरू झालेल्या पावसाच्या सरी सायंकाळपर्यंत कोसळत होत्या. शहरातील बहुतेक रस्ते जलमय झाले होते. सीना नदीही

| June 15, 2015 03:40 am

नगरमध्ये जोरदार पाऊस, सीना नदीही वाहू लागली

नगर शहरात आज, रविवारी पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून सुरू झालेल्या पावसाच्या सरी सायंकाळपर्यंत कोसळत होत्या. शहरातील बहुतेक रस्ते जलमय झाले होते. सीना नदीही दुथडी भरून वाहत होती. जिल्ह्य़ाच्या बहुतांशी भागात पावसाने आज हजेरी लावली.
नगर शहरात गेल्या चार दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे. कालही जोराचा पाऊस झाला. मान्सूनच्या आगमनाने शेतकरी आनंदी झाला आहे. हवेतही चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. दिवसभराच्या पावसाने शहराचे जनजीवन काहीसे विस्कळीत करून टाकले होते. रविवारची सुट्टी व दिवसभर कोसळणारा पाऊस यामुळे नगरकरांनी आजचा दिवस घरात बसूनच काढला. सायंकाळी पावसाचा जोर ओसरून त्याने काहीशी विश्रांती घेतली.
शहरातील नालेसफाईअभावी अनेक भागांत पावसाचे पाणी तुंबून रस्त्यांवर साचले होते, त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला होता. नालेगाव, बालिकाश्रम रस्त्यावरील काही घरातून पाणी शिरले. आजच्या पावसाने रस्त्यांना पूर्वीच असलेले खड्डे अधिकच रुंद केले. बहुतेक रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे वाहनचालकही हैराण झालेले आहेत. सीना नदीच्या उगम भागात मोठा पाऊस झाल्याने शहरातून जाणारी नदी दुथडी भरून वाहात होती. ते पाहण्यासाठी सायंकाळी नागरिकांनी नेप्ती पूल तसेच स्टेशन रस्त्यावरील लोखंडी पुलावर गर्दी केली होती.
जिल्ह्य़ात आज सकाळी आठ वाजता नोंदवलेला गेल्या चोवीस तासांतील झालेला पाऊस असा (आकडे मिमी. मध्ये)-नेवासे २, नगर २९, शेवगाव २८, पाथर्डी ९, कर्जत १०, जामखेड १३.१. एकूण ९०.१.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2015 3:40 am

Web Title: heavy rain in the city seena river flows
टॅग : City,Heavy Rain
Next Stories
1 बांधकाम कामगारांच्या योजनांची अंमलबजावणी ठप्प
2 राजकारणापासून अलिप्त होण्याचे द्विवेदींचे संकेत
3 शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके!
Just Now!
X