रायगड जिल्ह्यातील नागोठण्यामधून वाहणाऱ्या आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागोठयात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सकाळी साडेपाच वाजल्यापासून पाली येथील आंबा नदी पुलावरुन दोन ते तीन फूट पाणी वाहत असून पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुलावरील पाणी कमी झाल्यावर वाहतूक पूर्ववत करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. आंबा नदीची धोकादायक पातळी ९.०० मीटर असून सध्याची पातळी 9.60 मीटर आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 2, 2019 10:06 am
Web Title: heavy rain nagothana amba river dangerous level dmp 82